PM मोदींनी 'स्नॉर्कलिंग' केले, म्हणाले- ज्यांना 'अ‍ॅडव्हेंचर'ची आवड आहे त्यांनी...

Swapnil S

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या लक्षद्वीप दौऱ्याचे फोटो शेअर केले आहेत. यावेळी त्यांनी समुद्रात 'स्नॉर्कलिंग'चा आनंद घेतला. स्नॉर्कलिंगचे फोटो शेअर करताना, ज्यांना अॅडव्हेंचरची आवड आहे त्यांच्या यादीत लक्षद्वीप असणे आवश्यक आहे. मी स्नॉर्कलिंग करण्याचा प्रयत्न केला. तो एक आनंददायी अनुभव होता, असे त्यांनी म्हटले.
निसर्गसौंदर्यासोबतच लक्षद्वीपची शांतताही मनमोहक आहे. 140 कोटी भारतीयांच्या कल्याणासाठी आणखी कठोर परिश्रम कसे करायचे याचे चिंतन करण्याची संधी मला मिळाली, असेही त्यांनी फोटो शेअर करताना लिहिले. | PM
त्यांनी स्नॉर्कलिंगचा मनसोक्त आनंद घेतला आहे असं या फोटोंवरून दिसत आहे. त्यांनी पाण्याखालचे जीवनही बघितले.