पूजा बिरारी झाली बांदेकरांची 'होम मिनिस्टर'; शाही थाटात पार पडला सोहम-पूजाचा विवाह सोहळा; पाहा Photos
Mayuri Gawade
अभिनेत्री पूजा बिरारी आणि सोहम बांदेकर यांच्या लग्नाची सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू होती.
मेहेंदी, संगीत आणि हळद अशा सर्व पारंपरिक विधी उत्साहात पार पडले असून त्यांचे फोटो सतत सोशल मीडियावर वायरल होत होते.
लोणावळ्यातील आलिशान रिसॉर्टमध्ये त्यांच्या लग्नाची भव्य तयारी करण्यात आली होती.
या सोहळ्याला कुटुंबीयांसह मराठी कलाविश्वातील अनेक नामांकित सेलिब्रिटींनी हजेरी लावली.
अखेर पूजा बिरारी आणि सोहम बांदेकर यांनी आज शाही थाटात लग्नबंधनात अडकत आयुष्याची नवी सुरुवात केली.
लग्नावेळी पूजाने गुलाबी रंगाची सुंदर साडी नेसली होती, तर सोहमने आकर्षक डिझाईन असलेला कुर्ता परिधान केला होता.
दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड वेगाने वायरल होत आहेत.
फोटो व्हायरल होताच चाहत्यांनी या नवदांपत्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.