ऑफ-शोल्डर ब्लाऊज अन् निळ्या कॉटन साडीत पूजा सावंतचा एलिगंट अंदाज; Photo पाहून चाहते फिदा
Mayuri Gawade
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री पूजा सावंत पुन्हा एकदा तिच्या स्टायलिश फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.
या नव्या फोटोशूटमध्ये पूजाने निळ्या रंगाची सुंदर प्रिंटेड कॉटन साडी परिधान केली असून तिचा एलिगंट लूक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
कॉटन साडीसोबत ऑफ-शोल्डर ब्लाऊजची निवड करत पूजाने ट्रेडिशनल आणि मॉडर्न फॅशनचा सुंदर मिलाफ साकारला आहे.
ऑक्सिडाइज्ड चोकर, झुमके आणि बांगड्यांनी तिच्या संपूर्ण लूकमध्ये चार चाँद लावले आहेत.
हलका मेकअप, मोकळे वेव्ही केस आणि मोहक स्माईलमुळे पूजा आणखी आकर्षक दिसत आहे.
या फोटोशूटमधील प्रत्येक पोझ सोशल मीडियावर चाहत्यांच्या पसंतीस उतरली असून तिच्या लूकचं भरभरून कौतुक होत आहे.
गेल्या महिन्यात प्रदर्शित झालेल्या 'कप बशी' चित्रपटानंतर आता पूजाच्या या स्टायलिश फोटोशूटची जोरदार चर्चा रंगली आहे.
साधेपणा, एलिगन्स आणि ग्लॅमर यांचा सुंदर संगम असलेला पूजा सावंतचा हा नवा लूक चाहत्यांसाठी खास ठरत आहे. | Photo : Instagram|Pooja Sawant