मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री पूजा सावंतने यंदाच्या दिवाळीत पती सिद्धेश चव्हाणसोबत खास ट्विनिंग केलं असून दोघांचे सुंदर फोटो सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहेत.
धनत्रयोदशीच्या निमित्ताने पूजाने लाल रंगाची सुंदर साडी नेसली होती, तर सिद्धेशनेही लाल रंगाचा कुर्ता घालून तिच्यासोबत मॅचिंग केलं होतं.
दिवाळीसाठी पूजा आणि सिद्धेशने पुन्हा एकदा ट्विनिंग केलं असून दोघांनी केशरी रंगाचे पारंपरिक कपडे परिधान केले होते.
केशरी रंगाच्या साडीत पूजा खूपच सुंदर दिसत होती, तर त्याच रंगाच्या कुर्त्यात सिद्धेशनेही तिच्यासोबत खास पोझ दिली.
पूजाने नुकतेच दिवाळी पाडव्याचे फोटोही इन्स्टाग्रामवर शेअर केले असून यावेळी दोघांनी राखाडी रंगाच्या कपड्यांमध्ये ट्विनिंग केलं होतं.
पाडव्यासाठी पूजाने रंगीबेरंगी काठ असलेली राखाडी पैठणी नेसली होती, तर सिद्धेशने त्याला साजेसा राखाडी रंगाचा कुर्ता परिधान केला होता.
पाडव्याच्या फोटोशूटमध्ये पूजा आणि सिद्धेश एकमेकांकडे प्रेमाने पाहताना दिसत असून दोघांची ही गोड केमिस्ट्री लक्ष वेधून घेत आहे.
एका फोटोमध्ये पूजा सिद्धेशच्या गालावर प्रेमाने किस करताना दिसत असून दोघांचा हा रोमँटिक अंदाज चाहत्यांना विशेष आवडला आहे.
पूजाने पाडव्याचे फोटो शेअर करताना ‘Our first padwa together after our wedding’ असं कॅप्शन दिलं असून या सुंदर फोटोंवर चाहत्यांनीही प्रेमाचा वर्षाव केला आहे. | All Photos : Instagram | Pooja Sawant