Pooja Sawant : पिवळ्या लेहेंग्यात पूजा सावंतचं खुललं सौंदर्य! नवरात्रीसाठी तुम्हीही ट्राय करा हा लूक

Mayuri Gawade

मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंतने नुकतेच पिवळ्या रंगाच्या सुंदर लेहेंग्यातील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
पूजा सावंतचा आगामी ‘लग्न आणि बरंच काही’ हा चित्रपट २३ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
याच चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान पूजाने हा खास लूक केला असून, तिचे फोटो चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.
सध्या नवरात्रोत्सव सुरू असल्याने तुम्हीही गरबा, दांडिया किंवा एखाद्या खास कार्यक्रमासाठी पूजाच्या या लूकमधून फॅशन टिप्स घेऊ शकता.
पूजाने मोहरी पिवळ्या रंगाचा, नाजूक फुलांच्या नक्षीकामाने सजलेला लांब घेरदार लेहेंगा आणि त्याला साजेसा ब्लाउज परिधान केला आहे.
या लेहेंग्यासोबत तिने हलका पारदर्शक दुपट्टा घेतला असून, त्यामुळे तिचा संपूर्ण लूक अधिक उठावदार दिसत आहे.
हिरव्या खड्यांचे झुमके, मोत्यांचा आकर्षक चोकर आणि हातातील नाजूक बांगड्यांमुळे पूजाच्या पारंपरिक लूकला सुंदर साज चढला आहे.
तुम्हालाही नवरात्रीत साधा, आकर्षक आणि पारंपरिक लूक हवा असेल, तर पूजाप्रमाणे पिवळा लेहेंगा, हलके दागिने आणि वेणीची हेअरस्टाइल निवडू शकता. | All Photos : Instagram | Pooja Sawant