घरात सकारात्मक उर्जेसाठी 'या' टिप्स नक्की फॉलो करा

नेहा जाधव - तांबे

घरात सकारात्मक ऊर्जेच्या प्रवेशासाठी नेहमी घर स्वच्छ आणि नीटनेटके ठेवा. घराच्या कोपऱ्यात धूळ, जाळ्या आणि काजळीचा साठा होऊ देऊ नका. अनावश्यक वस्तू, मोडकी फर्निचर, जुनाट न वापरलेली वस्तू घरातून काढून टाका. | Photo - Canva
घराच्या अंगणात किंवा गॅलरीत तुळस, मोगरा, चमेली, पुदीना, रोझमेरी यासारख्या सुगंधी व औषधी वनस्पतींची लागवड करा. तसेच शोभेच्या वनस्पतींनी घराची सजावट करा. वनस्पती नेहमी सकरात्मक ऊर्जा देतात. | Photo - Canva
फेंगशुई किंवा वास्तु तत्वांचा वापर करा. घरात फेंगशुई वस्तू ठेवा. त्यामुळे घराला छान लूक येतो आणि त्यामुळे सकारात्मक ऊर्जाही येते. | Photo - Canva
घरात नेहमी आनंदी वातावरण ठेवा. भांडण, नकारात्मक बोलणं, तक्रारी टाळा. एकमेकांशी आनंदी आणि प्रेमळ संवाद साधा. जेणेकरून घरात सकारात्मक वातावरण राहील. | Photo - Canva
दररोज सकाळी आणि संध्याकाळी मंत्रोच्चार करा. मंत्रोच्चार हे नकारात्मक ऊर्जा दूर करून सकारात्मक लहरी निर्माण करतात. | Photo - Canva