रॉयल ब्लॅक साडी अन् स्टायलिश जॅकेट ब्लाऊज; प्राजक्ता गायकवाडचा ग्लॅमरस लूक एकदा पाहाच

किशोरी घायवट-उबाळे

प्राजक्ता गायकवाडचा ग्लॅमरस अंदाज - अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने खास फोटोशूट शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
ब्लॅक साडीचा हटके लूक - प्राजक्ताने काळ्या रंगाची आकर्षक डिझायनर साडी नेसली असून, त्यावर सुंदर एम्ब्रॉयडरी वर्क करण्यात आले आहे.
साडीवरील नक्षीकाम ठरलं खास - सिक्विन आणि जरीच्या नक्षीमुळे तिच्या या साडीला अधिकच रॉयल आणि ग्लॅमरस लूक मिळाला आहे.
नेटच्या जॅकेट ब्लाऊजची स्टायलिश जोड - साडीला मॅचिंग एम्ब्रॉयडरी असलेला नेटचा जॅकेट ब्लाऊज परिधान करून प्राजक्ताने पारंपरिक लूकला मॉडर्न टच दिला आहे.
मोठ्या झुमक्यांनी वेधलं लक्ष - गळ्यात कोणताही दागिना न घालता तिने केवळ मोठे सिल्व्हर स्टोन आणि डायमंड वर्कचे झुमके कॅरी केले आहेत.
पिंक मेकअपची सुंदर छटा - गुलाबी लिपस्टिक, पिंक आयशॅडो आणि खुल्या केसांमुळे तिच्या लूकमध्ये ग्लॅमरची भर पडली आहे.
नाजूक अंगठ्यांनी लूक पूर्ण - हातातील बांगड्या किंवा इतर दागिने टाळत प्राजक्ताने बोटात नाजूक अंगठ्या घातल्या आहेत.
फोटोंवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या - पारंपरिक साडी आणि मॉडर्न स्टाइलचा सुंदर मेळ साधत प्राजक्ताने आपला खास अंदाज दाखवला आहे.