Prajakta Gaikwad: फिल्मपेक्षाही भन्नाट! प्राजक्ता गायकवाडची रिअल लव्हस्टोरी; पाहा फोटो

Mayuri Gawade

‘स्वराज्यरक्षक संभाजी’मधील येसूबाई म्हणून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी प्राजक्ता गायकवाड आता नव्या आयुष्याच्या तयारीत आहे. | Instagram : Prajakta Gaikwad
७ ऑगस्ट रोजी तिचा धुमधडाक्यात साखरपुडा पार पडला. | Instagram : Prajakta Gaikwad
साखरपुड्यापर्यंत तिने आपल्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव गुप्त ठेवलं होतं, त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. | Instagram : Prajakta Gaikwad
आता मात्र प्राजक्ताच्या जोडीदाराचं नाव शंभूराज खुटवड असल्याचं समोर आलं आहे. | Instagram : Prajakta Gaikwad
शंभूराज खुटवड हे पुण्यातील फुरसुंगी इथले असून त्यांचा उद्योजक आणि राजकारणाशी संबंध आहे. | Instagram : Prajakta Gaikwad
अलिकडेच माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत प्राजक्ताने शंभुराजसोबतच्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला. | Instagram : Prajakta Gaikwad
त्यांची पहिली भेट अगदी फिल्मी होती! | Instagram : Prajakta Gaikwad
एकदा नाईट शिफ्टच्या शूटिंगसाठी जाताना प्राजक्ताच्या गाडीला अचानक ट्रकने धडक दिली. | Instagram : Prajakta Gaikwad
तेव्हा घटनास्थळी आलेल्या शंभूराजने ट्रकचालकाला धारेवर धरलं आणि प्राजक्ताला मदत केली. | Instagram : Prajakta Gaikwad
या अपघातामध्ये प्राजक्ताच्या गाडीचे नुकसान झाले होते. त्यात तिला शूटिंगला देखील जायचे होते, हे सगळं लक्षात घेता शंभुराजने तिला सेटवर सोडलं. | Instagram : Prajakta Gaikwad
इथपासूनच त्यांची ओळख झाली आणि लवकरच ती घट्ट मैत्रीत बदलली. | Instagram : Prajakta Gaikwad
शंभूराजला सुरुवातीपासूनच प्राजक्ता आवडत होती, तो तिला मॅडम अशी हाक मारायचा. | Instagram : Prajakta Gaikwad
प्राजक्ताला दोन्ही कुटुंबांच्या संमतीन लग्न करायचे होते. | Instagram : Prajakta Gaikwad
कुटुंबीयांनी होकार दिल्यावर त्यांच्या प्रेमकथेवर शिक्कामोर्तब झालं आणि साखरपुड्याने नात्याला नवा अध्याय मिळाला. | Instagram : Prajakta Gaikwad