Prajakta Gaikwad : राखाडी सिल्क साडीत अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचा मोहक अंदाज; एकदा फोटो पाहाच
किशोरी घायवट-उबाळे
शारदीय नवरात्रोत्सवाच्या सातव्या दिवशी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने राखाडी रंगाच्या साडीतील सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
नवरात्रीच्या सातव्या दिवशी राखाडी रंगाला विशेष महत्त्व असून, या रंगातील प्राजक्ताचा लूक चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
प्राजक्ताने हिरव्या रंगाची आकर्षक किनार असलेली राखाडी सिल्क साडी नेसली आहे.
या साडीमुळे प्राजक्ताच्या पारंपरिक लूकला एक वेगळीच शोभा आली आहे.
सुंदर दागिन्यांच्या साजामुळे प्राजक्ताचा मराठमोळा अंदाज खुलून दिसत आहे.
साडीला साजेसा आरी वर्क केलेला ब्लाऊज तिच्या लूकमध्ये अधिक आकर्षक भर घालतो.
या फोटोंसोबत प्राजक्ताने मुलींना आत्मविश्वासाचा संदेशही दिला आहे.
"आयुष्यात कितीही चढ-उतार आले किंवा संकटं आली, तरी स्वतःचा आत्मविश्वास कधीही गमावू नका," असे म्हणत तिने राखाडी रंगातून सकारात्मक विचार मांडले आहेत.