प्राजक्ता गायकवाडची लगीनघाई! हातावर रंगली शंभुराजच्या नावाची मेहंदी,पाहा फोटोज

Krantee V. Kale

'स्वराज्यरक्षक संभाजी'या मालिकेत महाराणी येसबूाईची भूमिका साकारुन अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड घराघरात पोहचली. | All photos- prajaktaa.gaikwad Instagram
प्राजक्ता गायकवाड २ डिसेंबर रोजी शंभुराज खुटवड यांच्यासोबत लग्नबंधनात अडकणार आहे.
अभिनेत्रीच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली असून नुकताच तिचा मेहंदी कार्यक्रम पार पडला.
प्राजक्ताने तिच्या मेहंदी कार्यक्रमातील काही खास फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो व्हायरल होत असून चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
प्राजक्ताने तिच्या मेहंदी सोहळ्याला खास हिरव्या रंगाचा लहंगा परिधान केला होता. या कार्यक्रमाला तिचा होणारा नवरा शंभुराज देखील उपस्थित होता.
प्राजक्ताच्या हातावर शंभुराजच्या नावाची मेहंदी रंगली.तिच्या दोन्ही हातांवर मोर डिझाईनची सुंदर मेहंदी काढण्यात आली.तिने हातावर शंभुराजचं नाव देखील लिहून घेतल आहे.
शंभुराजने देखील मेहंदीने एका हातावर 'प्राजक्ता का दुल्हा' अस नाव लिहून घेतलंय. तर दुसर्‍या हातावर सनई चौघडे आणि इंग्रजीत प्राजक्ता नाव लिहून घेतल आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, प्राजक्ता गायकवाडच्या लग्नाचा मुहूर्त २ डिसेंबर रोजी १२ वाजून २४ मिनिटे आहे.