कपाळावर गंध अन् डोक्यावर तुळस; प्राजक्ता गायकवाडचा भक्तिमय अंदाज, पाहा खास Photos

किशोरी घायवट-उबाळे

वारीत प्राजक्ताची हजेरी - 'पाठराखीण' मालिकेच्या शूटिंगमधून वेळ काढत अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आषाढी वारीत सहभागी झाली.
प्राजक्ताने वारकऱ्यांसोबत चालत वारीतील भक्तिमय वातावरणाचा मनापासून आनंद घेतल्याचे फोटोंमधून दिसते.
वारकरी परंपरेचे पालन करत प्राजक्ताने डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन खास फोटोशूट केले.
वारीतील फोटो शेअर करत प्राजक्ताने "वारी चुकायची नाही..." असे भावपूर्ण कॅप्शन दिले.
गुलाबी ड्रेस, हिरवी ओढणी आणि कपाळावरील टिळा अशा साध्या, पारंपरिक लूकमध्ये प्राजक्ता विशेष खुलून दिसली.
प्राजक्ताचे वारीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांकडून त्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
स्टार प्रवाहवरील 'पाठराखीण' मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी प्राजक्ता आता तिच्या या भक्तिमय अंदाजामुळेही चर्चेत आली आहे.