११५ वर्ष जुनी नथ, राजघराण्यातील तन्मणी; प्राजक्ताचा मराठमोळा साज व्हायरल, पाहा Photos

किशोरी घायवट-उबाळे

कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२६ मध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळीने मराठमोळ्या अंदाजात खास उपस्थिती लावली. | (सर्व छायाचित्रे: इंस्टाग्राम)
पारंपारिक वेशभूषा आणि राजेशाही दागिन्यांनी प्राजक्ताचा लूक अजून उठून दिसला. कानातील फुलवंती बुगडी आणि कर्णफुल झुब्यांनी पारंपारिक दागिन्यांची झलक पाहायला मिळाली.
अकलूजच्या सावंत राजघराण्याच्या ११५ वर्ष जुन्या नथीमुळे प्राजक्ताचा चेहरा अधिक खुलून दिसला.
हातातील पिछोडी, नमस्कार तोडे आणि शिंदेशाही तोड्यांनी लूकला ऐतिहासिक स्पर्श दिला.
तर चटईवीण बाजूबंदामुळे प्राजक्ताचा लूक अधिक रॉयल आणि हटके वाटला.
१२५ वर्षांहून अधिक जूना तन्मणी, छल्ला म्हणून परिधान करत प्राजक्ताने दागिन्यांमध्ये वेगळा प्रयोग केला.
पायातील गजरी पैंजणामुळे तिच्या संपूर्ण साजात भर पडली.
पेशवाई सिल्कच्या नऊवारी साडीतील प्राजक्ताचे फोटो सध्या व्हायरल होत आहे.
गळ्यातील सुवर्ण चंद्र ठुशी, कपाळावरील चंद्रकोर आणि पारंपरिक मेकअपने मराठमोळा साज अधिक उठून दिसला.
निळ्या-जांभळ्या शेल्यामुळे तिच्या संपूर्ण साजाला आकर्षक राजेशाही टच मिळाला.
कान्सच्या रेड कार्पेटवर प्राजक्ताच्या नऊवारी आणि दागिन्यांनी मराठी संस्कृतीची खास छाप पाडली.
"मिळत असलेल्या सगळ्या प्रेमाबद्दल… खूप प्रेम...#कृतज्ञ" असे म्हणत प्राजक्ताने सोशल मीडियाद्वारे सर्वांचे आभार मानले आहेत.