खास मैत्रिणीसह प्राजक्ता माळी श्री केदारनाथच्या दर्शनाला; पांढरी साडी, नाकात नथ, गळ्यात रुद्राक्ष...
नेहा जाधव - तांबे
अभिनेत्री प्राजक्ता माळीने २०२३ मध्ये १२ ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेण्याचा संकल्प केला होता. त्या संकल्पातील अकरावे ज्योतिर्लिंग पवित्र श्री केदारनाथ येथे नुकतेच तिने दर्शन घेतले. | (Photo - Prajkta Mali Instagram)
तिच्यासोबत अभिनेत्री अमृता खानविलकर ही देखील या अध्यात्मिक यात्रेत सहभागी झाली. भक्तिभाव, पारंपरिक वेशभूषा आणि आध्यात्मिकतेने भारलेले त्यांचे क्षण काही फोटोंमध्ये कैद झाले आहेत. | (Photo - Prajkta Mali Instagram)
प्राजक्ताने मोती रंगाची साडी, गळ्यात रुद्राक्षाची माळ, आणि कपाळावर गंध लावून पारंपरिक भक्तिभाव व्यक्त केला. | (Photo - Prajkta Mali Instagram)
अमृताने पांढरी साडी, नाकात नथ, पारंपरिक दागिने परिधान केले होते. तिच्या कपाळावरील गंध उठून दिसत होता. यामुळे ती अतिशय तेजस्वी दिसत होती. | (Photo - Amruta Khanvilkar Instagram)
हर हर महादेवचा जयघोष करत प्राजक्ता माळी आणि अमृता खानविलकर या दोघींनी भगवान शंकराचे दर्शन घेतले. त्यांच्या या यात्रेतील साधा पण आध्यात्मिक लूकने चाहत्यांना भारावून टाकले आहे. | (Photo - Amruta Khanvilkar Instagram)
प्राजक्ता माळीने तिच्या केदारनाथ यात्रेचे काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. निळे आभाळ, आणि हिमालयाच्या कुशीत वसलेले भव्य केदारनाथ मंदिर. प्राजक्ताने तिच्या अध्यात्मिक प्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा रसिकांसोबत शेअर केला आहे. | (Photo - Prajkta Mali Instagram)