Prajakta Mali Photos : प्राजक्ता माळी 'रंगिलो राजस्थान'च्या प्रेमात; सुंदर फोटोंची सोशल मीडियावर चर्चा

किशोरी घायवट-उबाळे

मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या राजस्थानच्या सौंदर्याने भारावून गेली आहे.
आगामी 'शुभ मंगलम जोडी दंगलम' या चित्रपटाच्या शूटिंगनिमित्त प्राजक्ता राजस्थानला गेली होती.
शूटिंगमधून वेळ काढत तिने जैसलमेरची सफर केली आणि काही खास फोटो चाहत्यांसोबत शेअर केले.
या फोटोंना कॅप्शन देत प्राजक्ताने म्हटले, "मला नेहमीच राजस्थानला जायचं होतं. मी माझ्या कुटुंबाकडे या ट्रिपसाठी सतत हट्ट करत होते आणि शेवटी मी माझी ही इच्छा पूर्ण करून दाखवलीच."
जैसलमेरमधील सोनेरी किल्ला पाहून प्राजक्ता पूर्णपणे मंत्रमुग्ध झाली.
तिथल्या ऐतिहासिक हवेल्यांवरील सुंदर कोरीव कामानेही तिचे लक्ष वेधून घेतले.
राजस्थानमधील रंगांची उधळण, गजबज आणि शांतता या सगळ्यांनी प्राजक्ताचे मन जिंकले.
जैसलमेरमधील एका दिवसाच्या सहलीत तिला संपूर्ण राजस्थानची झलक अनुभवायला मिळाल्याचे तिने पोस्टमध्ये म्हटले आहे.
राजस्थानबद्दल वाटणाऱ्या आकर्षणामागे 'पधारो म्हारे देश' या गाण्याचाही मोठा वाटा असल्याचे प्राजक्ताने आपल्या पोस्टमध्ये सांगितले.
संगीत हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग असल्याची खास कबुली देत प्राजक्ताने राजस्थानचे क्षण चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.