मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने नुकतेच तिच्या सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत. जांभळ्या रंगाच्या पारंपरिक साडीत तिचा हा एलिगंट अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
सोनसळी काठ असलेल्या सिल्क साडीसोबत प्रार्थनाने हलकासा मेकअप, स्टेटमेंट झुमके आणि पोनीटेल हेअरस्टाईलची निवड केली आहे. तिचा हा साधा पण आकर्षक लुक लक्ष वेधून घेत आहे.
कॅमेऱ्यासमोर विविध पोझ देताना प्रार्थनाचा आत्मविश्वास आणि ग्रेस दोन्हीही खुलून दिसत आहेत. पारंपरिक आणि मॉडर्न स्टाईलचा सुंदर मिलाफ तिच्या लुकमध्ये पाहायला मिळतो.
प्रार्थनाचा हा लुक सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. चाहत्यांनी तिच्या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत तिच्या सौंदर्याचं भरभरून कौतुक केलं आहे.
या चित्रपटात प्रार्थना एका दमदार भूमिकेत दिसणार असून, भावनिक आणि संघर्षमय प्रवास तिच्या व्यक्तिरेखेतून उलगडणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन अजय मयेकर यांनी केले आहे.
हे फोटो शेअर करत असतानाच प्रार्थना तिच्या आगामी 'मर्दिनी' चित्रपटामुळेही चर्चेत आहे. सध्या ती या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असल्याचं दिसत आहे.
'मर्दिनी' हा चित्रपट एका आईच्या संघर्षाची कथा मांडणारा आहे. आपल्या मुलावर संकट आल्यानंतर अन्यायाविरुद्ध उभी ठाकणाऱ्या आईची ताकद या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे.
अभिनेता श्रेयस तळपदे आणि दीप्ती तळपदे निर्मित 'मर्दिनी' हा चित्रपट येत्या ३ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. प्रार्थनाच्या या नव्या भूमिकेबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. | All Photos : Instagram | Prarthana behere