Ganeshotsav 2026 : प्रार्थना बेहेरेचा मराठमोळा अंदाज; दागिन्यांनी खुललं सौंदर्य, पाहा Photos

किशोरी घायवट-उबाळे

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिच्या घरी यंदा गणपती बाप्पाचे थाटामाटात आणि भक्तिमय वातावरणात आगमन झाले आहे.
गणेशोत्सवाचा आनंद साजरा करताना प्रार्थनाने सोशल मीडियावर तिचे काही खास फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये प्रार्थना डार्क कॉफी रंगाच्या पारंपरिक कांजीवरम सिल्क साडीत सुंदर अंदाजात दिसत आहे.
सोनेरी जरीच्या काठाची साडी आणि त्यावर कोपरापर्यंत बाही असलेला डिझायनर ब्लाऊज तिच्या लूकला खास उठाव देत आहे.
या पारंपरिक लूकला तिने दोन-तीन पदरी लांब सोनेरी हार, नाजूक मंगळसूत्र आणि आकर्षक झुमक्यांची जोड दिली आहे.
हातातील बांगड्या, नाजूक अंगठ्या आणि हातावरची सुंदर मेंदी तिच्या सणासुदीच्या लूकमध्ये भर घालत आहे.
प्रार्थनाचे हे पारंपरिक रूप सोशल मीडियावर चाहत्यांच्या पसंतीस उतरले असून, कमेंट्समधून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
बाप्पासोबतच प्रार्थनाचा हा पारंपरिक आणि शाही अंदाजही सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. | (सर्व फोटो : प्रार्थना बेहेरे/इन्स्टाग्राम)