'मर्दिनी'च्या प्रमोशनसाठी प्रार्थना बेहेरेचा सोज्वळ लूक; पिवळ्या साडीत खुललं सौंदर्य, पाहा Photos

किशोरी घायवट-उबाळे

'मर्दिनी' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र असलेली प्रार्थना बेहेरे नव्या लूकमुळे पुन्हा चर्चेत आली आहे. | (Photo - Instagram)
प्रार्थनाने सोशल मीडियावर पिवळ्या रंगाच्या सुंदर साडीतील मोहक फोटो शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधले.
हलका मेकअप, मोकळे केस आणि पारंपरिक दागिन्यांमुळे तिचा एलिगंट आणि ग्रेसफुल लूक अधिक खुलून दिसला.
प्रार्थनाचा 'मर्दिनी' हा चित्रपट ३ जुलै रोजी प्रदर्शित होणार असून, यात ती दमदार आणि वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.
एका सामान्य आईची आपल्या मुलीसाठी अन्यायाविरुद्ध लढणारी थरारक कहाणी 'मर्दिनी'मधून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
प्रार्थनाचा साडीतील लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला असून, सोशल मीडियावर तिच्या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.