Pratiksha Mungekar Photos : मस्टर्ड गोल्ड सिल्क साडी अन् मराठमोळा साज; प्रतीक्षाचे मनमोहक फोटो एकदा पाहाच

किशोरी घायवट-उबाळे

मराठी अभिनेत्री प्रतीक्षा मुणगेकर सध्या 'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.
या मालिकेत ती ऐश्वर्या ही महत्त्वाची भूमिका साकारत आहे.
अभिनयासोबतच प्रतीक्षा तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळेही चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते.
नुकतेच तिने काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या फोटोशूटमध्ये प्रतीक्षाचा पारंपरिक आणि देखणा अंदाज पाहायला मिळत आहे.
तिने मस्टर्ड गोल्ड रंगाची सुंदर सिल्क साडी नेसली आहे.
या साडीला असलेला गडद लाल रंगाचा नक्षीदार काठ तिच्या लूकला खास उठाव देत आहे.
नाकातील नाजूक नथ, कानातील झुमके आणि हातातील सोनेरी बांगड्यांनी तिच्या सौंदर्यात आणखी भर घातली आहे.
प्रतीक्षाचा हा मराठमोळा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरत असून तिच्या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.