तुमची जुनी साडी फेकू नका! प्रियदर्शिनी इंदलकरप्रमाणे द्या तिला मॉडर्न ट्विस्ट

Mayuri Gawade

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकरने काळ्या बनारसी साडीचं को-ऑर्ड सेटमध्ये रूपांतर करत पारंपरिक लूकला मॉडर्न टच दिला आहे. तिचा हा अंदाज सोशल मीडियावर सर्वांनाच आवडला आहे.
ऑफ-शोल्डर ब्लाऊजमध्ये प्रियदर्शिनीचा ग्लॅमरस अंदाज उठून दिसतो. जड साडीला असा ट्रेंडी कट देऊन तुम्हीही पार्टीसाठी हटके लूक तयार करू शकता.
हाय स्लिट स्कर्टमुळे प्रियदर्शिनीच्या आउटफिटला स्टायलिश फ्लो मिळतो. लग्नसमारंभ किंवा रिसेप्शनसाठी ही आयडिया परफेक्ट ठरू शकते.
बनारसी सिल्कवरील सोनेरी नक्षीकाम आणि काळ्या रंगाची झलक प्रियदर्शिनीच्या लूकला रिच फिनिश देते. साडीचा पदर किंवा बॉर्डर अशा पद्धतीने वापरून ड्रेस अधिक खास बनवता येतो.
नैसर्गिक कुरळे केस मोकळे ठेवून प्रियदर्शिनीने लूक साधा पण एलिगंट ठेवला आहे. जड आउटफिटसोबत मिनिमल हेअरस्टाईल हा नेहमीच सुरक्षित पर्याय ठरतो.
मोठे कुंदन झुमके आणि स्टेटमेंट अंगठीमुळे प्रियदर्शिनीच्या अंदाजाला रॉयल टच मिळाला आहे. पारंपरिक आणि मॉडर्न फॅशनचा सुंदर मेळ तिच्या लूकमध्ये दिसतो.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून प्रसिद्ध झालेली प्रियदर्शिनी आता फॅशन स्टेटमेंटमुळेही चर्चेत आहे. साडीपासून तयार केलेल्या या ड्रेसने तिचा आत्मविश्वास अधिक खुलला आहे.
प्रियदर्शिनी इंदलकरचा हा बनारसी मेकओव्हर लूक फक्त ग्लॅमरसच नाही, तर सस्टेनेबल फॅशनचीही झलक दाखवतो. कपाटातली साडी नव्या रूपात वापरण्याची ही प्रेरणादायी आयडिया आहे. | सर्व छायाचित्र : इंस्टाग्राम (प्रियदर्शिनी इंदलकर)