प्रियदर्शिनी इंदलकरचा ग्लॅमरस अंदाज; नव्या फोटोशूटने वेधलं चाहत्यांचं लक्ष

किशोरी घायवट-उबाळे

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रियदर्शिनी इंदलकर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नव्या फोटोशूटमधील तिचा स्टायलिश लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या फोटोशूटमध्ये प्रियदर्शिनीने पांढरा ओव्हरसाइज शर्ट आणि पिवळ्या रंगाचा हेवी वर्क असलेला ऑफ-शोल्डर ड्रेस परिधान केला आहे.
लूकला अधिक आकर्षक बनवण्यासाठी तिने गोल्डन स्टड इअररिंग्स, स्टायलिश चोकर, अंगठ्या आणि मिनिमल मेकअपची निवड केली आहे.
केसांचा नीटनेटका बन, सटल मेकअप आणि कॉन्फिडंट पोझमुळे प्रियदर्शिनीचा हा ग्लॅमरस अवतार चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
या फोटोंना तिने 'समंदर में नहाके और भी....' असे हटके कॅप्शन दिले असून, चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
प्रियदर्शिनी इंदलकर लवकरच दिग्दर्शक शैलेश नरवाडे यांच्या आगामी 'जयंती २' चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे.