Priyanka Chopra Photos : परदेशातही जपतेय भारतीय संस्कृती! निक अन् लेकीसोबत प्रियांकाची दिवाळी; पाहा खास फोटो
किशोरी घायवट-उबाळे
परदेशात राहूनही भारतीय सण आणि संस्कृतीशी नाळ जोडून ठेवणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने यंदाची दिवाळी लॉस एंजेलिसमध्ये कुटुंबीयांसोबत मोठ्या उत्साहात साजरी केली.
प्रियांकाने तिच्या घरी दिवाळीनिमित्त खास पार्टीचे आयोजन केले होते. या सेलिब्रेशनचे काही सुंदर क्षण तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या खास प्रसंगी प्रियांकासोबत तिचा पती निक जोनस आणि मुलगी मालती मेरी चोप्रा जोनसही उपस्थित होते.
दिवाळीच्या सेलिब्रेशनसाठी प्रियांकाने बरगंडी आणि गोल्डन रंगाचा आकर्षक ऑफ शोल्डर गाऊन परिधान केला होता.
या गाऊनवर सुंदर जरदोजी वर्क, सोनेरी धाग्यांची नक्षी आणि बारीक मण्यांचे डिझाइन पाहायला मिळत आहे.
प्रियांकाने आपल्या लूकला पारंपरिक टच देण्यासाठी कपाळावर कुंदनचा मांगटिका, मोठे गोल्डन इअररिंग्स आणि हातात मॅचिंग बांगड्या घातल्या होत्या.
केसांचा सुंदर लो बन बनवून त्यामध्ये पांढऱ्या फुलांचा गजरा माळला होता. स्मोकी आय मेकअप आणि बेरी शेडच्या लिपस्टिकमुळे तिचा लूक अधिकच खुलून दिसत होता.
दुसरीकडे, निक जोनसने क्रीम आणि व्हाइट रंगाचा एम्ब्रॉयडरी केलेला कुर्ता सेट परिधान केला होता. तर लेक मालतीनेही पांढऱ्या रंगाचा सुंदर लेहेंगा घातला होता.
विशेष म्हणजे, निक आणि मालती यांनीही आपल्या कपड्यांमधून दिवाळीच्या सेलिब्रेशनसाठी रंगसंगती जुळवली होती. तिघांचेही फोटो चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.
प्रियांका केवळ दिवाळीच नव्हे, तर दसरा आणि करवा चौथसारखे भारतीय सणही अमेरिकेत कुटुंबासोबत साजरे करते. आपल्या मुलीला भारतीय परंपरा आणि संस्कृतीची ओळख करून देण्याचा तिचा प्रयत्न या फोटोंमधूनही दिसून येतो.