देसी गर्लचा ग्लॅमरस अवतार! ब्राइडल लूकसाठी परफेक्ट आयडिया; प्रियांका चोप्राचे लेटेस्ट फोटो पाहाच
Mayuri Gawade
बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा सध्या तिच्या आगामी ‘वाराणसी’ सिनेमामुळे प्रचंड चर्चेत आहे. | सर्व छायाचित्र : इंस्टाग्राम (Priyanka Chopra)
याच चित्रपटाच्या एका इव्हेंटदरम्यान प्रियांकाने वेअर केलेला पांढरा लेहंगा आणि त्यातील तिचा ग्लॅमरस अवतार सध्या सोशल मीडियावऱ् धूम उडवत आहे.
डिझायनर अनामिका खन्ना यांनी तयार केलेल्या या लेहंग्यात नाजूक फ्लोरल आणि गोल्ड सिक्विन वर्क खास उठून दिसत होता.
मऊ एम्ब्रॉयडरी असलेला दुपट्टा आणि सोनसळी काठ प्रियांकाच्या संपूर्ण लुकला रॉयल टच देतोय.
"चॅनलिंग माय इनर देवी" असं कॅप्शन देत प्रियांकाने इंस्टाग्रामवर तिचे हे अप्रतिम फोटो शेअर केले.
साऊथ इंडियायन टच देणारा कंबरपट्टा आणि मोती-सोन्याचे हेअर अॅक्सेसरीज लूकला अधिक एलिगंट बनवतात.
शिमरी मेकअप, ग्लोईंग स्किन आणि लाईट ब्राउन ग्लॉसी लिप्सने लुकला परफेक्ट फिनिश दिला.
प्री-वेडिंग साजेसा, एलिगंट आणि हटके असा हा पांढरा लेहेंगा, नववधूसाठी एकदम परफेक्ट ठरू शकतो.