प्रियांका गांधींचा लेक बांधणार बालमैत्रिणीसोबत लग्नगाठ! आहे तरी कोण 'ही' वाड्रा कुटुंबाची होणारी सून?

Mayuri Gawade

प्रियांका गांधी–वाड्रा यांचा मुलगा रेहान वाड्रा याचा नुकताच साखरपुडा झाल्याची माहिती समोर आली आहे. | X
रेहानने त्याची बालपणीची मैत्रीण आणि दीर्घकाळापासूनची गर्लफ्रेंड अवीवा बेग हिच्याशी साखरपुडा केला असून, या वृत्ताला आता अधिकृत दुजोरा मिळाला आहे. | All Photo | Instagram
स्वतः रेहानने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून अवीवासोबतचा एक सुंदर फोटो शेअर करत या नात्यावर शिक्कामोर्तब केलं आहे.
या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने हार्ट आणि अंगठीचे इमोजी वापरले असून, त्यावरून साखरपुड्याची स्पष्ट माहिती मिळते. रेहानची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
दरम्यान, प्रियांका गांधी यांनीही रेहान आणि अवीवा यांचा बालपणीचा एकत्रित फोटो शेअर केला आहे. “तुम्हा दोघांना खूप प्रेम. नेहमी एकमेकांचा आदर करा आणि तीन वर्षांचे असल्यापासून जसे चांगले मित्र राहिलात, तसेच आयुष्यभर एकत्र रहा,” अशा शब्दांत त्यांनी या जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
गांधी–वाड्रा कुटुंबाची होणारी सून अवीवा बेग नक्की कोण आहे, याचीही उत्सुकता निर्माण झाली आहे.
अवीवा दिल्लीच्या प्रतिष्ठित कुटुंबातील असून, तिचे वाड्रा कुटुंबासोबत जुने संबंध असल्याचे सांगितले जाते.
ती व्यवसायाने फोटोग्राफर आणि प्रोड्युसर असून, ‘Atelier 11’ या फोटोग्राफी स्टुडिओ आणि प्रोडक्शन कंपनीची सह-संस्थापक आहे.
रेहानने अवीवाला प्रपोज केल्यानंतर तिने लग्नासाठी होकार दिला आणि दोन्ही कुटुंबांच्या संमतीने हा साखरपुडा पार पडला.