‘मन धावतंया तुझ्याच मागं...’! मराठी पॉप दुनियेत धुमाकूळ घालणारी राधिका भिडे कोण आहे?
Mayuri Gawade
‘आय पॉपस्टार’ या संगीत शोमधून एक मराठी आवाज सध्या सगळीकडे चर्चेत आहे. या गायिकेने सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. | सर्व छायाचित्र : इंस्टाग्राम (Radhika Bhide)
ही गायिका म्हणजे राधिका भिडे, ‘सा रे ग म प’ फेम गायिका शमिका भिडेची लहान बहीण. दोघी बहिणींच्या गोड आवाजाने सगळ्यांना भुरळ घातली आहे.
“मन धावतंया तुझ्याच मागं, डोलतंया तुझ्याचसाठी…” या गाण्याने राधिकाने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे.
स्टेजवर गाताना राधिकाने घेतलेला मराठमोळा लूक सगळ्यांना भावला. काळा ब्लाऊज, जांभळी नऊवारी, नथ, आणि कपाळावर चंद्रकोर!
तिच्या या सादरीकरणाने परीक्षकही प्रभावित झाले. सगळ्यांनी तिच्या आवाजाचं आणि मराठी गाण्याचं कौतुक केलं.
राधिका मूळची रत्नागिरीची असून सध्या मुंबईत राहते. तिने अजय-अतुल आणि श्रेया घोषाल यांच्या कॉन्सर्ट्समध्येही भाग घेतलाय.
एका गाण्याने राधिकाची लोकप्रियता झपाट्याने वाढली आहे. तिचे इंस्टाग्रामवर ७० हजारांहून अधिक फॉलोअर्स झाले आहेत.
तिचा गोड आवाज आणि निरागस स्मितहास्यामुळे राधिका भिडे आज मराठी संगीतविश्वातील नवी स्टार ठरली आहे.