मुंबईपासून ते संपूर्ण राज्यभरात दहीहंडी म्हंटली की मानवी मनोरे डोळ्यांसमोर येतात.
मात्र, रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुका अशा दहीहंडी उत्सवाला मात्र अपवाद आहे. | (Photo - Insta/Kurdusdahihandi)
अलिबागमधील कुर्डूस गावात अनोख्या दहीहंडीचे आयोजन केले जाते. | (Photo - Insta/Dronemanus)
या गावात पाण्याने भरलेल्या खोल अशा विहीरीवरच्या दहीहंडीचे विशेष आकर्षण आहे. | (Photo - Insta/Kurdusdahihandi)
१९९२ साली केणी, शेरामकर, पिंगळे कुटुंबांनी विहिरीवर दहीहंडी बांधून उडी मारून फोडण्याचा आगळावेगळा उत्सव सुरू केला. | (Photo - Insta/Kurdusdahihandi)
या परंपरेत गोविंदा हवेत उंच उडी मारून दहिहंडीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो. स्पर्श झाल्यास दहीहंडी फोडली जाते, अन्यथा दुसऱ्या पथकाला संधी दिली जाते. | (Photo - Insta/Kurdusdahihandi)
अख्ख्या पंचक्रोशीत या उत्सवाला गावकरी भरभरून प्रतिसाद देतात. हा उत्सव पाहण्यासाठी पुणे, मुंबईहून लोकं कुर्डूस गावात गर्दी करतात. | (Photo - Insta/KokanchiShan)