रेल्वे स्टेशनच्या नावातील 'टर्मिनस', 'जंक्शन' आणि 'कॅन्ट'चा अर्थ काय? ९०% लोकांना माहिती नाही!
Mayuri Gawade
रेल्वेने प्रवास करताना अनेक स्टेशनच्या नावापुढे टर्मिनस, जंक्शन, सेंट्रल किंवा कॅन्ट असे शब्द दिसतात. पण त्यांचा नेमका अर्थ काय, हे तुम्हाला माहिती आहे का?
टर्मिनस (Terminal) म्हणजे रेल्वे मार्गाचा शेवटचा स्टेशन. या स्टेशननंतर पुढे रेल्वे ट्रॅक नसतो आणि ट्रेनला त्याच मार्गाने परत जावे लागते.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) आणि आनंद विहार टर्मिनल (दिल्ली) ही टर्मिनस स्टेशनची प्रसिद्ध उदाहरणे आहेत.
जंक्शन (Junction) म्हणजे असे स्टेशन, जिथून रेल्वे मार्ग दोन किंवा अधिक दिशांना विभागले जातात. त्यामुळे गाड्या वेगवेगळ्या मार्गांवर जाऊ शकतात.
सेंट्रल (Central) हा शब्द मोठ्या शहरांतील सर्वाधिक महत्त्वाच्या आणि व्यस्त रेल्वे स्टेशनसाठी वापरला जातो. येथून देशातील अनेक शहरांसाठी रेल्वे सेवा उपलब्ध असते.
कॅन्ट (Cantt) हा शब्द Cantonment वरून आला आहे. अशा स्टेशनजवळ लष्करी छावणी किंवा सैन्य क्षेत्र असते.
आग्रा कॅन्ट, अंबाला कॅन्ट आणि दिल्ली कॅन्ट ही अशा रेल्वे स्टेशनची काही प्रसिद्ध उदाहरणे आहेत.
पुढच्या वेळी रेल्वेने प्रवास करताना स्टेशनच्या नावापुढील हे शब्द दिसले, तर त्यांचा अर्थ तुम्हाला सहज ओळखता येईल. | Photo : Ai Generated