रेनकोट खरेदी करताना 'या' चुका टाळा; नाहीतर पावसात होईल मनस्ताप
किशोरी घायवट-उबाळे
फक्त स्वस्त असल्यामुळे रेनकोट खरेदी करू नका. कमी किमतीच्या रेनकोटमध्ये पाणी झिरपण्याची शक्यता जास्त असते. | (सर्व छायाचित्रे :Yandex)
योग्य साईज न तपासता खरेदी करू नका. खूप घट्ट किंवा खूप सैल रेनकोट वापरण्यास अस्वस्थ ठरू शकतो.
वॉटरप्रूफ मटेरियल तपासायला विसरू नका. रेनकोट खरेदीपूर्वी त्याचे फॅब्रिक खरोखर वॉटरप्रूफ आहे का, हे पाहा.
शिवण आणि झिपची गुणवत्ता दुर्लक्षित करू नका. कमकुवत शिवण किंवा निकृष्ट झिपमुळे पावसाचे पाणी आत जाऊ शकते.
हुड (Cap) नीट बसतो का ते तपासा. योग्य आकाराचा हुड डोके आणि चेहरा पावसापासून सुरक्षित ठेवतो.
खिसे आणि हवेशीर डिझाइनकडे दुर्लक्ष करू नका. वॉटरप्रूफ खिसे आणि हवा खेळती राहील असे डिझाइन अधिक सोयीचे ठरते.
वापरल्यानंतर रेनकोट ओला ठेवू नका. रेनकोट वाळवून ठेवला तर तो जास्त काळ टिकतो आणि दुर्गंधीही येत नाही.