घरभर कपडे टांगण्याची गरज नाही! पावसाळ्यात कपडे वाळवण्याची 'ही' भन्नाट ट्रिक जाणून घ्या

Mayuri Gawade

पावसाळ्यात कपडे वाळवणं हे अनेक घरांमधील मोठं आव्हान असतं. कमी जागेमुळे घरभर कपडे टांगण्याची वेळ येते.
कपडे वाळत घालण्यासाठी मोठं स्टँड वापरण्याऐवजी एका साध्या हँगरचा भन्नाट उपयोग करून जागा वाचवता येते.
या ट्रिकसाठी फक्त एक मजबूत हँगर आणि ४ ते ५ जाड रबर बँड पुरेसे आहेत. महागड्या स्टँडची गरज नाही.
हँगरला थोड्या अंतरावर मजबूत रबर बँड बांधा. प्रत्येक रबरमध्ये आणखी एक हँगर सहज अडकवता येईल.
ओले कपडे वेगवेगळ्या हँगरवर लावा आणि ते हँगर मुख्य हँगरवरील रबरमध्ये अडकवा. त्यामुळे एकाच ठिकाणी अनेक कपडे वाळतील.
या पद्धतीने एका हँगरवर चार ते पाच कपडे टांगता येतात. कमी जागेतही भरपूर कपडे वाळवणे सोपे होते.
तयार केलेला हँगर पाऊस न लागणाऱ्या हवेशीर जागेत लटकवा. हवेमुळे कपडे लवकर सुकण्यास मदत होते.
ही ट्रिक वापरल्याने घरभर दोऱ्या किंवा स्टँड लावण्याची गरज राहत नाही. घरही नीटनेटके दिसते.
पावसाळ्यात कमी जागेत जास्त कपडे वाळवण्यासाठी ही सोपी आणि कमी खर्चाची ट्रिक नक्की करून पाहा. | All Photos : AI Generated