पावसाळ्यात त्वचा तजेलदार ठेवण्यासाठी सोपे उपाय

नेहा जाधव - तांबे

पावसाळ्यात हवा दमट आणि ओलसर असते, त्यामुळे त्वचेची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. त्यामुळे पुढे दिलेल्या टिप्सच्या मदतीने तुम्ही पावसाळ्यातही तुमचे सौंदर्य टिकवून ठेवू शकता. | (फोटो सौ. canva)
पावसात त्वचेवर दमट वातावरणाने आणि पाण्यामुळे ओलावा साचतो. ज्यामुळे मुरुम आणि बुरशीजन्य इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो. त्यासाठी रोज दिवसातून दोन वेळा चेहरा सौम्य फेसवॉशने धुवा. यामुळे त्वचा ताजीतवानी आणि फ्रेश वाटते. पावसात चिकटपणा जाणवतो, तो फेसवॉशने कमी होतो. | (फोटो सौ. canva)
पावसाळ्यात त्वचेवर मृत पेशी साचतात, ज्यामुळे त्वचा निस्तेज दिसते. स्क्रबिंग केल्याने ही साठलेली मृत त्वचा निघून जाते आणि त्वचेला नवचैतन्य मिळते. | (फोटो सौ. canva)
पावसात दमट हवेमुळे त्वचा तेलकट वाटते, पण तरीही ती आतून कोरडी असू शकते. पुरेसं पाणी प्यायल्याने त्वचा आतून हायड्रेट राहते, मृदू आणि तजेलदार दिसते. | (फोटो सौ. canva)
पावसाळ्यात ताज्या फळं-भाज्यांचा, व्हिटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडंट्सचा आहार त्वचेला आतून पोषण देतो आणि सौंदर्य टिकवतो. ह्या टिप्सचा नियमितपणे अवलंब केल्यास तुम्ही पावसाळ्यातही सुंदर आणि ताजेतवाने दिसू शकता. | (फोटो सौ. canva)
पावसाळ्यात ढगाळ वातावरण असले तरीही UV-A आणि UV-B किरणं जमिनीपर्यंत पोहोचतात. या किरणांमुळे त्वचा काळवंडते, सुरकुत्या येतात. त्यामुळे पावसाळ्यातही सनस्क्रीनचा वापर करा. त्यासाठी ऑइल-फ्री आणि वॉटरप्रूफ सनस्क्रीन वापरा. म्हणजे चेहऱ्यावर दमटपणा येणार नाही. | (फोटो सौ. canva)
पावसाळ्यात चेहरा स्वच्छ, तजेलदार आणि मुरुमं-मुक्त ठेवण्यासाठी गुलाबपाणी वापरा. गुलाबपाणी त्वचेला थंडावा देतं आणि तेलकटपणा कमी करते. कापसावर गुलाबपाणी घेऊन रोज चेहरा पुसा. त्यामुळे चेहऱ्यावर तेल साचत नाही आणि त्वचा मृदू राहते. | (फोटो सौ. canva)