गुलाबी साडीत खुलला 'राजा शिवाजी' फेम दिशा परदेशीचा सोज्वळ अंदाज; पाहा सुंदर फोटो
किशोरी घायवट-उबाळे
'राजा शिवाजी' चित्रपटात अफझल खानच्या पत्नीची भूमिका साकारलेली अभिनेत्री दिशा परदेशीने नुकतेच तिचे नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
गुलाबी रंगाच्या एलिगंट साडीत दिशाचा साधा पण आकर्षक लूक चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
मंदिर आणि निसर्गाच्या सान्निध्यात काढलेल्या या फोटोंना फ्रेश टच मिळाला आहे.
ऑफ-व्हाइट ब्लाऊज आणि मिनिमल ज्वेलरीमुळे तिचा पारंपरिक अंदाज अधिक खुलून दिसतो.
झुमके, बांगड्या आणि नैसर्गिक मेकअपने दिशाच्या सौंदर्यात भर घातली आहे.
मोकळे केस आणि हलके स्मित तिच्या लूकला एक वेगळीच मोहकता देत आहेत.
दिशाच्या या सोज्वळ लूकवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कौतुकाच्या कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
पारंपरिक फॅशन आणि साधेपणा पाहायचा असेल तर दिशा परदेशीचा हा गुलाबी साडीतील लूक नक्कीच पाहण्यासारखा आहे.