Raksha Bandhan 2026 : यंदा बहिणीला नेहमीच्या गिफ्टऐवजी द्या खास सरप्राईज; 'या' आयडिया नक्की ट्राय करा

किशोरी घायवट-उबाळे

वैयक्तिक गिफ्ट द्या - तिच्या नावाची अक्षरे, खास तारीख किंवा संदेश कोरलेले ब्रेसलेट, पेंडंट किंवा अंगठी भेट द्या. | (सर्व छायाचित्र : Yandex)
स्टायलिश बॅग ठरेल उपयोगी - टोट, स्लिंग किंवा मिनी बॅग तिच्यासाठी फॅशनेबल आणि उपयोगी गिफ्ट ठरू शकते.
सेल्फ-केअर किट तयार करा - तिच्या आवडीची स्किनकेअर, मेकअप किंवा सेल्फ-केअर उत्पादने एकत्र करून खास किट बनवा.
बुकलव्हर बहिणीसाठी खास गिफ्ट - आवडत्या प्रकारातील पुस्तके, सुंदर बुकमार्क, जर्नल किंवा रीडिंग लॅम्प भेट द्या.
छंदाशी संबंधित भेट द्या - आर्ट साहित्य, बेकिंग टूल्स, कॅमेरा ॲक्सेसरीज किंवा रोपांसारखे तिच्या छंदाशी जोडलेले गिफ्ट निवडा.
तिला आवडीचे गिफ्ट स्वतः निवडू द्या - ठरावीक बजेट द्या आणि तिला हवे ते खरेदी करू द्या. शेवटी तिच्या आवडीचे जेवणही द्या.
फॅमिली ट्रिप करा - भावंड आणि चुलत-मावस भावंडांना एकत्र घेऊन जवळच्या ठिकाणी छोटासा ट्रिप प्लॅन करा.
जुन्या आठवणींना उजाळा द्या - बालपणीच्या आवडत्या गोष्टी आठवून ग्रीटिंग कार्ड बनवून बहिणीला सरप्राईज द्या.
तिच्या आवडीचे चॉकलेट्स गिफ्ट म्हणून द्या. यामुळे तुमच्या बहिणीला नक्कीच आनंद होईल.