रकुल अन् जॅकी अडकले लग्नबंधनात! फोटो केले शेअर

Swapnil S

रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी 21 फेब्रुवारी रोजी गोव्यात विवाहबद्ध झाले.
दोघांनी दोन रितीरिवाजानुसार लग्न केले. आधी रकुल आणि जॅकीचे शीख परंपरेनुसार लग्न झाले आणि त्यानंतर सिंधी रितीरिवाजांनुसार दोघांनी सात फेरे घेतले.
या खास प्रसंगी या जोडप्याने एक खास पोशाख परिधान केला होता, जो सर्वांचे मन जिंकत आहे.
रकुल प्रीत सिंहने तिच्या लग्नासाठी फॅशन डिझायनर तरुण ताहिलियानीने डिझाइन केलेला लेहेंगा घातला होता. या पेस्टल रंगाच्या लेहेंग्यात पूर्ण हँडवर्क होता.
त्याचबरोबर जॅकी भगनानीच्या शेरवानीवर चिकनकारी करण्यात आली आहे.