दिवाळी पार्टीसाठी पारंपरिक आणि मॉडर्न लूकचा सुंदर मेळ साधायचा असेल, तर अभिनेत्री रकुल प्रीत सिंहच्या या खास साडी लूकमधून तुम्ही फॅशन टिप्स घेऊ शकता.
रकुलने परिधान केलेली गडद निळ्या रंगाची साडी दिवाळीच्या संध्याकाळच्या पार्टीसाठी एक आकर्षक आणि एलिगंट पर्याय ठरू शकते.
साध्या साडीवर भरजरी ब्लाऊज घालण्याची स्टाईल सध्या लोकप्रिय असून, रकुलच्या या लूकमध्येही तिचा आकर्षक ब्लाऊज विशेष लक्ष वेधून घेतो.
सोनेरी नक्षीकाम, आरशांसारखी चमकदार सजावट आणि रंगीबेरंगी खड्यांनी सजलेला रकुलचा स्लीव्हलेस ब्लाऊज दिवाळी पार्टीसाठी उत्तम फॅशन आयडिया आहे.
रकुलप्रमाणे साडीवर मोठे, रंगीबेरंगी झुमके घातल्यास जास्त दागिने न घालताही तुमचा दिवाळी पार्टी लूक उठावदार दिसू शकतो.
हातात आकर्षक ब्रेसलेट आणि अंगठ्या घालून रकुलने आपला लूक पूर्ण केला असून, तुम्हीही अशा मोजक्या दागिन्यांनी साडीला स्टायलिश टच देऊ शकता.
दिवाळी पार्टीसाठी रकुलप्रमाणे हलका ग्लोइंग मेकअप, डोळ्यांना सौम्य आयलाइनर आणि न्यूड पिंक लिपस्टिक निवडल्यास चेहरा अधिक खुलून दिसू शकतो.
रकुलने केसांना सॉफ्ट वेव्ह्ज देऊन एका बाजूला मोकळे सोडले असून, ही हेअरस्टाईल साडीबरोबर अगदी सहज आणि आकर्षक दिसते.
यंदाच्या दिवाळी पार्टीत रकुलप्रमाणे साधी गडद रंगाची साडी, डिझायनर ब्लाऊज आणि मोजके स्टेटमेंट दागिने निवडून तुम्हीही सुंदर आणि ग्लॅमरस लूक मिळवू शकता. | All Photos : Instagram | Rakul Singh