'रामायण' ट्रेलर लाँचमध्ये रकुल प्रीत सिंहचा रॉयल अंदाज; पिवळ्या सिल्क साडीत जिंकली चाहत्यांची मनं

Mayuri Gawade

'रामायण'च्या ट्रेलर लाँच सोहळ्यात अभिनेत्री रकुल प्रीत सिंहने पिवळ्या रंगाच्या सिल्क साडीत दमदार उपस्थिती लावत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
मोहरी रंगाच्या सिल्क साडीला रकुलने हेवी एम्ब्रॉयडरी असलेल्या स्ट्रॅपलेस ब्लाऊजची जोड देत पारंपरिक लूकला मॉडर्न टच दिला.
रॉयल लूक पूर्ण करण्यासाठी तिने चोकर नेकलेस, स्टेटमेंट इअररिंग्स, बांगड्या, अंगठ्या आणि आकर्षक कमरपट्टा परिधान केला होता.
सॉफ्ट वेव्ही हेअरस्टाईल आणि न्यूड मेकअपने रकुलचा एलिगंट आणि क्लासी लूक अधिकच खुलून दिसला.
या खास लूकचे फोटो रकुलने सोशल मीडियावर शेअर करत 'रामायण'चा भाग असल्याचा आनंद आणि अभिमान व्यक्त केला.
नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण'मध्ये रकुल प्रीत सिंह रावणाची बहीण शूर्पणखा ही महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे.
रकुलच्या या पारंपरिक अवतारावर चाहत्यांनी भरभरून प्रेम व्यक्त केले असून तिच्या स्टाईलची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
एलिगन्स, रॉयल ज्वेलरी आणि पिवळ्या सिल्क साडीचा अप्रतिम मिलाफ असलेला रकुल प्रीत सिंहचा हा लूक सध्या फॅशनप्रेमींसाठी स्टाईल इन्स्पिरेशन ठरत आहे. | All Photos : Rakul Preet Singh | Instagram