रणदीप हुड्डाने आपल्या बायकोला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्या

Swapnil S

अभिनेता रणदीप हुड्डाने लिन लैश्राम हिच्याशी 29 नोव्हेंबर रोजी पारंपारिक समारंभात लग्न केले होते. या दोघांच्या लग्नात त्यांच्या जवळचे खास लोकं उपस्थित होते.
रणदीपने सोशल मीडियावर बायकोसोबत फोटो शेयर करत लिहले आहे की, "माहित नव्हते की आयुष्य इतके बदलेल. मला स्थिरता आणि शांतता दिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. तुझ्यावर नेहमीच प्रेम करत राहीन", असे त्याने लिहले होते.
रणदीप हा हिंदी चित्रपट आणि काही इंग्रजी चित्रपटांमध्ये त्याच्या कामासाठी ओळखला जातो. हुड्डा यांनी मान्सून वेडिंग या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते .
त्याने त्याच्या लग्नाची पार्टी ११ डिसेंबरला मुबंईत दिली होती.त्या पार्टीत अनेक बॉलीवूडचे कलाकार आले होते.
लिन लैश्राम हिला अनेक चाहत्यांनी कंमेंट्समध्ये शुभेच्या दिल्या आहेत.