अंबरनाथमध्ये आढळला ‘मास्क बुबी’; पॅसिफिक-अटलांटिक किनाऱ्याचा दुर्मिळ समुद्र पक्षी
Swapnil S
अंबरनाथच्या नागरी भागात 'मास्क बुबी' नावाचा दुर्मिळ समुद्र पक्षी सापडला. | छाया सौ. विजय गोहिल
पॅसिफिक आणि अटलांटिक महासागरातील बेटांवर हा पक्षी सामान्यतः आढळतो. | छाया सौ. विजय गोहिल
वाऱ्याच्या प्रभावामुळे भरकटत हा पक्षी अंबरनाथमध्ये आल्याचा अंदाज आहे. | छाया सौ. विजय गोहिल
चिंचपाडा परिसरात एका रहिवाशाला तो रस्त्याच्या कडेला अस्वस्थ अवस्थेत आढळला. | छाया सौ. विजय गोहिल
त्या नागरिकाने त्वरित वन विभागाशी संपर्क साधून माहिती दिली. | छाया सौ. विजय गोहिल
बदलापूरचे वन अधिकारी व रेस्क्युअर्स यांच्या मदतीने पक्ष्याला सुरक्षित ताब्यात घेतले गेले. | छाया सौ. विजय गोहिल
मास्क बुबी हा समुद्रात सूर मारून मासे पकडण्यात निष्णात असतो. | छाया सौ. विजय गोहिल
स्थलांतरित नसतानाही तो हजारो किलोमीटर भक्ष्याच्या शोधात भटकतो. | छाया सौ. विजय गोहिल
दिशा चुकल्यामुळे तो स्थलभागात पोहोचल्याचे वन अधिकाऱ्यांचे मत आहे. | छाया सौ. विजय गोहिल
वन विभागाच्या तत्परतेमुळे दुर्मिळ प्रजातीचा पक्षी संरक्षित करण्यात आला आहे. | छाया सौ. विजय गोहिल