रश्मिका-विजयची संगीत नाईट चर्चेत; कुटुंबीयांसोबत डान्स, रोमँटिक फोटोंनी वेधलं लक्ष

Mayuri Gawade

मनोरंजनसृष्टीतील नवविवाहित दाम्पत्य रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांचं नुकतंच थाटामाटात लग्न झालं.
उदयपूरमध्ये पारंपरिक पद्धतीने विवाहसोहळा पार पडल्यानंतर आता त्यांनी त्यांच्या संगीत नाईटचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या फोटोंवर काही वेळातच लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
रश्मिकाने सिल्वर शेडमधील चमकणारा शरारा परिधान केला होता. तिच्या ड्रेसवर नाजूक एम्ब्रॉयडरी आणि सीक्विन वर्क उठून दिसत होतं.
तिने डायमंडचा स्टेटमेंट नेकलेस, मॅचिंग इअररिंग्स आणि आकर्षक रिंग्स घालून लूक पूर्ण केला.
बन हेअरस्टाईल आणि हलक्या मेकअपने तिचं सौंदर्य अधिक खुललं.
विजयने गडद निळ्या रंगाची स्टायलिश शेरवानी आणि डिझायनर ब्लेझर परिधान केला होता.
गळ्यातील हिरव्या स्टोनचं लॉकेट त्याच्या लूकला वेगळेपण देत होतं.
संगीत सोहळ्यात दोघांनी कुटुंबीयांसोबत मनसोक्त डान्स केला. आई-वडील, भावंडं आणि जवळचे मित्रमंडळी डान्स फ्लोअरवर ठेका धरताना दिसत होते.
काही भावनिक भाषणांमुळे वातावरणात आनंदासोबतच डोळ्यात पाणी आणणारे क्षणही निर्माण झाले.
“आनंदाचे अश्रू आणि प्रेमाने भरलेली रात्र” अशा आशयाच्या कॅप्शनने दोघांनी त्या अविस्मरणीय क्षणांची आठवण चाहत्यांसोबत शेअर केली.
त्यांच्या या रोमँटिक आणि भावनिक फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
सर्व छायाचित्र : इंस्टाग्राम (रश्मिका मंदाना व विजय देवरकोंडा)