'नॅशनल क्रश'चा टॅग मिळताच रसिका सुनील चर्चेत; हिरव्या साडीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Mayuri Gawade

मराठी अभिनेत्री रसिका सुनीलच्या नव्या फोटोशूटने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. हिरव्या साडीतील तिचा एलिगंट लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
रसिकाने पोपटी-हिरव्या रंगाची सिल्क साडी आणि गडद मरून ब्लाऊज परिधान करत पारंपरिक लूकला ग्लॅमरस टच दिला आहे.
मोकळे केस, हलका ग्लॅम मेकअप आणि आत्मविश्वासपूर्ण पोझ यामुळे रसिकाचा हा लूक अधिकच आकर्षक दिसत आहे.
कधी पुस्तक वाचताना, तर कधी कॅमेऱ्यासमोर दिलेल्या स्टायलिश पोझमुळे तिच्या प्रत्येक फोटोची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
हे फोटो समोर येताच चाहत्यांसह अनेक मराठी कलाकारांनीही कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव करत रसिकाच्या लूकचं भरभरून कौतुक केलं.
कॉमेडियन आणि अभिनेता सारंग साठ्ये यांनी रसिकाला थेट 'नॅशनल क्रश' म्हणत खास प्रतिक्रिया दिली. त्यानंतर हा लूक आणखी चर्चेत आला.
काही दिवसांपूर्वी 'जीडीएन' या बहुप्रतीक्षित दाक्षिणात्य चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यात रसिकाने याच लूकमध्ये उपस्थिती लावली होती.
फॅशन एक्सपेरिमेंट्स आणि ग्लॅमरस फोटोशूटसाठी ओळखली जाणारी रसिका सुनील लवकरच तिच्या आगामी दाक्षिणात्य चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. | All Photos : Instagram | Rasika Sunil