'शनाया'चा कातिल अंदाज पाहिलात? लाल साडीत अभिनेत्री रसिका सुनीलने वेधलं लक्ष

Mayuri Gawade

'नॅशनल क्रश' म्हणून लोकप्रिय असलेली मराठमोळी अभिनेत्री रसिका सुनील आपल्या अभिनयासोबतच सौंदर्य आणि स्टायलिश लूकमुळे नेहमीच चर्चेत असते.
'माझ्या नवऱ्याची बायको' या लोकप्रिय मालिकेतील 'शनाया' या भूमिकेमुळे रसिकाला महाराष्ट्राच्या घराघरांत ओळख मिळाली.
सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या रसिकाने नुकतेच लाल रंगाच्या सुंदर साडीतील काही ग्लॅमरस फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
या फोटोशूटसाठी रसिकाने लाल रंगाची नक्षीदार साडी आणि त्यावर मॅचिंग स्लीव्हलेस ब्लाऊज परिधान करून आपला बोल्ड अंदाज दाखवला आहे.
मोकळे सोडलेले वेव्ही केस, हलका मेकअप आणि चेहऱ्यावरील सुंदर हावभाव यामुळे रसिकाचा लाल साडीतील हा लूक अधिकच खुलून दिसत आहे.
लाल साडीतील या फोटोशूटमध्ये रसिकाने दिलेल्या वेगवेगळ्या पोझ आणि तिच्या मोहक अदांमुळे तिचा ग्लॅमरस अंदाज लक्ष वेधून घेत आहे.
कधी दिलखुलास हसत तर कधी कॅमेऱ्यासमोर स्टायलिश पोझ देणाऱ्या रसिकाचा आत्मविश्वास आणि सौंदर्य या फोटोंमधून पाहायला मिळत आहे.
मालिका, चित्रपट आणि नाटकांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडणारी 'नॅशनल क्रश' रसिका सुनील आता तिच्या नव्या ग्लॅमरस फोटोशूटमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. | All Photos : Instagram | Rasika Sunil