लाल की पांढरा? कोणता पेरू आरोग्यासाठी अधिक फायदेशीर?

Mayuri Gawade

पांढरा आणि लाल पेरू दोन्ही पौष्टिक असून आरोग्यासाठी उपयुक्त आहेत. | सर्व छायाचित्र : पिंटरेस्ट
पांढऱ्या पेरूमध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण जास्त असल्यामुळे तो रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो.
त्वचेची चमक वाढवण्यासाठी आणि सर्दी-फ्लूपासून बचावासाठी पांढरा पेरू फायदेशीर ठरतो.
लाल पेरूमध्ये लायकोपीनसारखे अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात.
हे घटक हृदयाचे आरोग्य सुधारतात आणि कर्करोगापासून संरक्षण करतात.
हृदयरोग किंवा रक्तदाबाच्या त्रास असलेल्या लोकांसाठी लाल पेरू अधिक चांगला पर्याय आहे.
दोन्ही प्रकारचे पेरू फायबरने समृद्ध असल्याने पचन सुधारते आणि साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवतात.
म्हणून तुमच्या शरीराच्या गरजेनुसार पांढरा किंवा लाल पेरू निवडल्यास आरोग्याला नक्कीच फायदा होतो.