चहाप्रेमींनो, उरलेला चहा पुन्हा गरम करुन पिता? जाणून घ्या गंभीर परिणाम
Krantee V. Kale
अनेकांची सकाळची सुरुवात चहाने होते. पण काहींना उरलेला दुधाचा चहा पुन्हा गरम करुन पिण्याची सवय असते.
दुधाचा चहा बनवल्यानंतर काही वेळातच खराब होऊ शकतो. म्हणून उरलेला चहा गरम करुन प्यायल्याने आरोग्यावर कोणते परिणाम होतात, जाणून घ्या.
उरलेल्या चहामध्ये हानिकारक बॅक्टेरिया आणि बुरशी विकसित होऊ शकतात, ज्यामुळे पोटदुखी, अपचन, गॅस आणि अतिसार होऊ शकतो.
जर चहा बराच काळ उघडा ठेवला असेल किंवा चहा बनवून खूप वेळ झाला असेल तर तो प्यायल्याने अन्नातून विषबाधा होण्याचा धोका असतो.
चहा पुन्हा गरम करुन प्यायल्याने पोटात सूज येणे, पोट जड वाटणे किंवा पोट फुगणे अशा समस्या उद्भवतात.
उरलेला चहा प्यायल्याने पोटात आम्लता वाढू शकते, ज्यामुळे छातीत जळजळ आणि अॅसिडिटी होते.
शिळ्या चहामध्ये कॅफिन आणि इतर हानिकारक पदार्थ जमा होऊ शकतात. ज्यामुळे, डोकेदुखी आणि थकवा यासारख्या समस्या वाढू शकतात.
दररोज उरलेला चहा पुन्हा गरम करुन प्यायल्याने यातील बॅक्टेरिया शरीराच्या रोगप्रतिकार शक्तीवर परिणाम करू शकतात, ज्यामुळे रोगांशी लढण्याची क्षमता कमी होते.
नेहमी ताजा आणि चांगला उकळून तयार केलेला चहा प्या.
(Disclaimer: या लेखात दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. नवशक्ति’ यातून कोणताही दावा करत नाही.)