लहानपणीच्या आठवणी होतील ताज्या; घरच्या घरी बनवा टेस्टी चिंचेच्या गोळ्या; जाणून घ्या रेसिपी

Kkhushi Niramish

लहानपणी चिंचेच्या गोळ्या खाण्यासाठी मन किती आतूर व्हायचं ना! चला घरच्या घरी बनवू चिंचेच्या गोळ्या आणि पुन्हा जगूया बालपण काय लागणार साहित्य - चिंच, गुळ, साखर, थोडेस तूप. सर्वप्रथम साखर मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घ्या.
साखर वाटून झाल्यावर चिंच देखील मिक्सरमध्ये एकदा फिरवून वाटून घ्या.
आता पॅनमध्ये तूप थोडे गरम करा यात गुळ घाला
गुळाची छान पेस्ट करून घ्या.
या गुळाच्या पेस्टमध्ये वाटलेली चिंच टाका
दोन्ही मिश्रण हलके घट्ट होईपर्यंत उकळून घ्या.
या मिश्रणाचे हातावर छोट्या छोट्या गोळ्या तयार करा
या गोळ्या बारीक केलेल्या पीठी साखरेत बुडवून काढा
चिंचेच्या आंबट गोळ्या तयार आहेत.