मुलांच्या पांढऱ्याशुभ्र युनिफॉर्मवर चिखलाचे डाग? पाण्यात 'हा' १ पदार्थ टाका; कपडे दिसतील नव्यासारखे
Mayuri Gawade
पावसाळ्यात मुलांच्या युनिफॉर्मवर चिखलाचे डाग पडणं ही सामान्य समस्या असली, तरी ते काढण्यासाठी योग्य उपाय माहिती असणं गरजेचं आहे.
चिखलाचे डाग सुकल्यानंतर कपडे जोरात घासू नका. त्यामुळे कापड खराब होऊ शकते आणि डाग अधिक घट्ट बसू शकतात.
युनिफॉर्मवरील हट्टी डाग काढण्यासाठी महागडे क्लिनर नाही, तर स्वयंपाकघरातील व्हाईट व्हिनेगरही प्रभावी ठरू शकतो.
एका बादलीत कोमट पाणी घेऊन त्यात अर्धा कप व्हाईट व्हिनेगर मिसळा आणि डाग असलेला युनिफॉर्म २० ते ३० मिनिटे भिजत ठेवा.
कपडा भिजल्यानंतर डागाच्या जागेवर हलक्या हाताने चोळा आणि नंतर नेहमीच्या डिटर्जंटने धुतल्यास डाग सहज निघण्यास मदत होते.
खूप जुने किंवा हट्टी चिखलाचे डाग असतील, तर व्हाईट व्हिनेगरमध्ये थोडा बेकिंग सोडा मिसळून तयार केलेली पेस्ट वापरू शकता.
रंगीत युनिफॉर्मवर कोणताही उपाय करण्यापूर्वी कपड्याच्या न दिसणाऱ्या भागावर पॅच टेस्ट करून घेणं अधिक सुरक्षित ठरतं.
चिखल लागलेले कपडे गरम पाण्यात धुणे, ब्लीच वापरणे किंवा डाग निघण्यापूर्वी ड्रायरमध्ये टाकणे या चुका टाळा.
मुलं शाळेतून आल्यानंतर युनिफॉर्म लगेच धुतल्यास चिखलाचे डाग सहज निघतात आणि कपडे अधिक काळ स्वच्छ व नवीनसारखे दिसतात. | All Photos : AI Generated