बटर पनीर असो किंवा पनीर रोल, पनीरपासून अनेक स्वादिष्ट पदार्थ तयार केले जातात. हे पदार्थ लहानापासून थोरांपर्यंत सर्वांनाच आवडतात.
भारतीय स्वयंपाकगृहामध्ये पनीरपासून नियमितपणे पदार्थ बनवले जातात. अशा परिस्थितीत अनेकजण पनीर जास्त प्रमाणात खरेदी करतात आणि फ्रीजमध्ये स्टोर करतात.
बऱ्याचदा पनीर जास्त दिवस फ्रिजमध्ये राहिल्यानं कोरडं होतं. त्यामुळं त्याची चव आंबट होऊ लागते.
बहुतेक लोक पनीरची चव आंबट झाल्यानंतर त्याचा वापर करत नाहीत. काहीजण तर ते खराब झालंय, असं समजून फेकून देतात.
आज आम्ही तुम्हाला असा उपाय सांगणार आहोत, ज्यामुळं पनीरचा आंबटपणा कमी होऊ शकतो.
फ्रिजमध्ये ठेवलेलं पनीर आंबट लागू लागलं, तर त्याला क्युब्समध्ये कापून घ्या. एका पॅनमध्ये २ ग्लास पाणी आणि १-२ चमचे मीठ मिसळा आणि गॅसवर ठेवा.
पाणी उकळू लागल्यानंतर त्यामुळं पनीर टाकून उकळू द्या. पनीर जेव्हा उकळून सॉफ्ट होतील, तेव्हा ते गॅसवरून खाली उतरा आणि पाणी गाळणीच्या माध्यमातून वेगळं करा.
आता पनीर थंड पाण्यामध्ये धुवून वापरू शकता. असं केल्यामुळं पनीर फ्रेश होईल आणि त्याचा आंबटपणाही कमी होईल.
जर तुम्ही फ्रीजमध्ये पनीर खूप जास्त दिवस स्टोर करत असाल, तर एका बाऊलमध्ये पाणी घ्या आणि पनीर न कापता पाण्यात ठेवून फ्रीजमध्ये ठेवून द्या.
पनीरला तुमच्या आवडत्या आकारात कापून झिप लॉक बॅगमध्ये ठेवूनही तुम्ही फ्रीजमध्ये स्टोर करू शकता. पनीरला हवा लागली नाही, तर त्याचं टेक्स्चर खराब होत नाही.