Republic Day Rangoli Designs : प्रजासत्ताक दिनासाठी परफेक्ट रांगोळी, पाहा खास डिझाईन्स
किशोरी घायवट-उबाळे
तिरंगा रांगोळी (Tricolour Rangoli) : केशरी, पांढरा आणि हिरवा या तीन रंगांची रांगोळी प्रजासत्ताक दिनासाठी खास ठरते. | (सर्व छायाचित्रे :Yandex)
अशोकचक्र थीम रांगोळी : निळ्या रंगातील अशोकचक्र आणि सभोवती तिरंगा शेड्स वापरून साधी पण अर्थपूर्ण रांगोळी काढता येते.
भारतीय नकाशावर आधारित रंगोली : भारताचा नकाशा काढून त्यात तिरंगा रंग भरल्यास रांगोळी वेगळी आणि प्रभावी दिसते.
सैनिक (Indian Army) थीम रांगोळी : सीमेवर देशाचं रक्षण करणाऱ्या जवानांच्या सन्मानार्थ सैनिकांची प्रतिमा असलेली रंगोली खास ठरते.
रांगोळीसाठी अनेक डिझाइन्स उपलब्ध असून तिरंगी ध्वजाची रांगोळी सोपा पर्याय ठरू शकते.
फुलांची रंगोली (Eco-Friendly Rangoli) : झेंडू, गुलाब, पानं वापरून केलेली नैसर्गिक रांगोळी पर्यावरणपूरक आणि ट्रेंडिंग पर्याय ठरत आहे.
कोणतेही रांगोळी काढताना तिरंगी ध्वजाचा, रंगांचा अपमान होणार नाही, याची विशेष काळजी घ्या.