प्रजासत्ताकदिनानिमित्त 'हे' प्रेरणादायी चित्रपट नक्की बघा!

Swapnil S

भारताच्या प्रजासत्ताक दिन हा आज साजरा केला जातो . या दिवशी झेंडावंदन केले जाते. अनेक कार्यक्रमांचं आयोजन केले जाते. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने देशप्रेम व्यक्त करतात. आज या दिवशी देशावरचे काही चित्रपट बघून घ्या.
राज़ी :- हा चित्रपट देशासाठी हेरगिरी करणाऱ्या एका धाडसी मुलीची कथा आहे.
नीरजा :- नीरजा हा चित्रपट वास्तविक जीवनातील घटनेवर आधारित आहे.
रंग दे बसंती : भारतीय स्वातंत्र्यलढ्यामध्ये सिंहाचा वाटा उचलणारे चंद्रशेखर आझाद, भगत सिंग, शिवराम हरी राजगुरू, अशफाक उल्ला खान व राम प्रसाद बिस्मिल ह्या थोर स्वातंत्र्यसेनान्यांवर एक चित्रपट काढण्याचे स्वप्न घेऊन एक ब्रिटिश तरुणी नवी दिल्लीमध्ये येते.
मेरी कोम : मेरी कोम हा २०१४ ला प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. प्रियांका चोप्राची प्रमुख भूमिका असलेल्या ह्या चित्रपटामध्ये प्रसिद्ध भारतीय महिला बॉक्सिंगपटू व ऑलिंपिक कांस्य-पदक विजेती मेरी कोम हिचे व्यक्तिचित्र रंगवले आहे.