Reshma Shinde : नऊवारी, पैठणी अन् पारंपरिक दागिने; मंगळागौरीसाठी अभिनेत्रीचा लूक एकदा पाहाच

Mayuri Gawade

श्रावणात सध्या सगळीकडे मंगळागौरीच्या कार्यक्रमांची लगबग सुरू आहे. नवविवाहितांसाठी खास असलेल्या या सणाला काय लूक करायचा, यासाठी रेश्मा शिंदेची स्टाइल नक्कीच आयडिया देईल.
मंगळागौरीसाठी रेश्माने खास मराठमोळा लूक केला असून, तिचे हे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
रेश्माने गडद जांभळ्या रंगाची सुंदर पैठणी नऊवारी साडी नेसून पारंपरिक अंदाजाला पसंती दिली आहे.
पैठणी नऊवारीसोबत आरी वर्क असलेला सुंदर ब्लाऊज रेश्माच्या लूकला खास टच देत आहे.
पारंपरिक मराठमोळ्या दागिन्यांची जोड देऊन रेश्माने नऊवारीचा साज आणखी खुलवला आहे.
नथ, पारंपरिक दागिने आणि नऊवारीच्या साजात रेश्माचा हा मराठमोळा अंदाज लक्ष वेधून घेत आहे.
गडद जांभळ्या पैठणीचा रंग आणि पारंपरिक दागिन्यांचा साज मंगळागौरीच्या लूकसाठी सुंदर पर्याय ठरतो.
मंगळागौरीच्या कार्यक्रमासाठी पारंपरिक लूक ठेवायचा असेल, तर रेश्माचा हा नऊवारी अंदाज नक्कीच सेव्ह करून ठेवण्यासारखा आहे.
मंगळागौरीच्या निमित्ताने महिला एकत्र येऊन पारंपरिक खेळ, गाणी आणि जागरणाचा आनंद घेतात.
यंदाच्या मंगळागौरीसाठी मराठमोळा लूक करण्याचा विचार असेल, तर रेश्माचा हा संपूर्ण अंदाज तुमच्यासाठी परफेक्ट आयडिया ठरू शकतो.
सर्व छायाचित्र : इंस्टाग्राम | रेश्मा शिंदे