गालावरची खळी अन् जांभळी साडी; रेश्मा शिंदेचा मनमोहक लूक

नेहा जाधव - तांबे

मालिकाविश्वातील सर्वांची आवडती जानकी म्हणजेच रेश्मा शिंदे हिने जांभळ्या साडीत आपले फोटो शेअर केले आहेत. | (Photo - Insta/reshmashinde02)
आपल्या व्यक्तिरेखेप्रमाणेच अगदी साधा, सोज्वळ लूक तिने केला आहे. या फोटोतील तीची गालावरची खळी जास्तच उठून दिसत आहे. | (Photo - Insta/reshmashinde02)
केसांत गजरा, लहानशी टिकली, नाजुक असं मंगळसूत्र आणि जांभळया साडीमध्ये ती अधिकच उठून दिसत आहे. | (Photo - Insta/reshmashinde02)
'रंग माझा वेगळा' या मालिकेतून रेश्माला नवी ओळख मिळाली. दीपाच्या आगळी वेगळी भूमिका प्रेक्षकांना अधिकच भावली होती. | (Photo - Insta/reshmashinde02)
कृष्णवर्णीय स्त्रियांना समाजात मिळणारी वागणूक आणि त्यांच्या व्यथा तिने या मालिकेतून मांडल्या होत्या. | (Photo - Insta/reshmashinde02)
आता ती स्टार प्रवाहावरच्या 'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेतून जानकी हे पात्र साकारते आहे. | (Photo - Insta/reshmashinde02)
घराला जोडून ठेवणारी आदर्श सून म्हणून या मालिकेत तीची व्यक्तीरेखाही लोकांच्या मनाला स्पर्श करत आहे. यामध्ये तीची दमदार भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. | (Photo - Insta/reshmashinde02)