Reva Kaurase : लाल साडी, नाकात नथ अन् केसात गजरा! 'बिग बॉस मराठी'फेम अभिनेत्रीचा मराठमोळा अंदाज पाहिलात?

Mayuri Gawade

‘बिग बॉस मराठी ६’मध्ये वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून एन्ट्री घेतलेली रेवा कौरसे या शोनंतर चांगलीच चर्चेत आली आणि प्रेक्षकांमध्ये तिने आपली वेगळी ओळख निर्माण केली.
सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या रेवाने आता लाल साडीतील खास फोटोशूटचे काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
लाल रंगाची साडी नेसून रेवाने या फोटोशूटमध्ये पारंपरिक आणि स्टायलिश अशा दोन्ही अंदाजांचा सुंदर मेळ साधला आहे.
साडीसोबत रेवाने स्ट्रॅपलेस ब्लाऊजची निवड केली असून, त्यामुळे तिच्या पारंपरिक लूकला मॉडर्न टच मिळाला आहे.
नाकात नथ, कानात झुमके आणि हातात सोनेरी बांगड्या घालून रेवाने आपल्या लूकला मराठमोळा साज दिला आहे.
केसात माळलेला पांढऱ्या फुलांचा लांबसडक गजरा रेवाच्या लाल साडीतील लूकची शोभा आणखी वाढवत आहे.
कपाळावर छोटीशी टिकली, ग्लॅमरस मेकअप आणि पारंपरिक दागिन्यांमुळे रेवाचा हा लूक आणखी उठून दिसत आहे.
कधी साडी सावरताना, तर कधी हातात गजरा घेऊन पोझ देताना रेवाने या फोटोशूटमध्ये आपल्या वेगवेगळ्या अदा दाखवल्या आहेत.
लाल साडीतील प्रत्येक फोटोमध्ये रेवाचा वेगळा अंदाज पाहायला मिळत असून, तिच्या या फोटोशूटने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
रेवाने शेअर केलेल्या या फोटोंना सोशल मीडियावर पसंती मिळत असून, तिच्या लाल साडीतील लूकची चाहत्यांमध्ये चर्चा होत आहे. | All Photos : Reva Kaurase's Instagram