तांदळाचे पाणी केसांसाठी वरदान; केस होतील मजबूत अन् चमकदार, वाचा जबरदस्त फायदे

Krantee V. Kale

बदलती जीवनशैली आणि वाढत्या प्रदूषणामुळे केस गळणे, केस निर्जीव अन् कोरडे होणे अशा समस्या उद्भवतात.
या समस्यांवर उपाय म्हणून तुम्ही तांदळाचे पाणी वापरु शकता. तांदळाचे पाणी केसांना लावल्यास कोणते फायदे होतात, जाणून घ्या.
तांदळाचे पाणी केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. कारण यात असलेले व्हिटॅमिन्स,मिनरल्स आणि अमिनो ॲसिड केसांना पोषण देतात. ज्यामुळे केस मजबूत आणि दाट होतात.
तांदळाच्या पाण्यात प्रोटीन आणि मिनरल्स असतात. यामुळे केसांची मुळं मजबूत होतात आणि केस तुटणे आणि गळणे कमी होते.
तांदळाचे पाणी केसांना लावल्याने त्यांची चमक वाढते. नियमित वापरामुळे केसांतील कोरडेपणा कमी होतो. तसेच, केस सॉफ्ट होतात.
तांदळाचे पाणी टाळूला हायड्रेट आणि स्वच्छ करते. यामुळे एक्झिमा आणि कोंडासारख्या समस्या कमी होतात.
तांदळाच्या पाण्यातील पोषक तत्वे आणि अँटीऑक्सिडंट्स केसांच्या वाढीस मदत करतात. नियमित तांदळाचे पाणी वापरल्याने केस जाड आणि मजबूत होऊ शकतात.
तांदळाचे पाणी तयार करण्यासाठी अर्धा कप तांदूळ धुवून घ्या. यामध्ये दुप्पट पाणी घालून रात्रभर भिजवा किंवा १०-१५ मिनिटे उकळवा. नंतर पाणी गाळून घ्या आणि आठवड्यातून २ ते ३ वेळा केसांवर लावा.
(Disclaimer: या लेखात दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. नवशक्ति’ यातून कोणताही दावा करत नाही.)